Mahebub Shaikh : आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाण्यापासून थांबवा, अन्यथा राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार

Mahebub Shaikh : महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या ५८,००० नोकऱ्या जाणार आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकारने एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात आणलेला नाही आहे. मात्र महाराष्ट्रात असलेले उद्योग देखील सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार संभाळू शकत नाही आहे. जर राज्य सरकारने १० जून पर्यंत या कंपन्या पुन्हा महाराष्ट्रात राहण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर या ट्रिपल इंजिन खोके सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

महेबूब शेख म्हणाले की, राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यास सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार अपयशी ठरले आहे. तसेच राज्यातील पुणे, पिंपरी, चिंचवडमधील कंपन्या देखील आता राज्याबाहेर जात आहेत. मात्र, राज्य सरकार हे रोजगार थांबवण्यात अपयशी झाले. राज्यातील रोजगार इतर राज्यात जात असताना आता हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. हे गद्दार सरकार केवळ आमदार फोडण्यात मश्गुल आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रोजगार देखील राज्याबाहेर जात आहेत, असे महेबूब शेख म्हणाले.

पुढे महेबूब शेख म्हणाले की, हे सरकार काय करते कशामध्ये व्यस्त आहे. राज्य सरकार नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सिंधुदुर्गाचा पाणीबुडी प्रकल्प, हिऱ्याचा वापर, बॉलिवूडचा फिल्म फेअर अवार्ड हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले असताना काल हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना हे सरकार बघायची भूमिका का घेत आहे. असा प्रश्न महाराष्ट्रातील युवकांना पडलेला आहे. या विषयांमध्ये राजकारण करायचं नाही. आमचे सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे तर गुजरातला आमच्या महाराष्ट्रातले पब घेऊन जा. हुक्का पार्लर गुजरातला घेऊन जा हे घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आमच्या युवकांच्या हातातचा रोजगार पळून घेऊन जात आहे. महाराष्ट्रातील युवकांच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देत आहात असेही महेबूब शेख यांनी म्हटले आहे.

महेबूब शेख म्हणाले की, पुण्यात ३७ कंपन्या गेल्यामुळे जवळपास ५८००० लोकांचा रोजगार हा जाणार किंवा स्थलांतरित होणार आहे. त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार देखील आता त्या रोजगाराला मुकावा लागणार आहे. बेरोजगारी १०.८% बेरोजगारीचा दर झाला आहे. हे मी सांगत नाही नीती आयोगाचा अहवाल सांगत आहे. एवढी मोठी बेरोजगारी होत असताना अजून महाराष्ट्रातल्या नवीन तुम्ही तर काही कंपन्या आणल्या नाहीत तुम्ही सध्या पक्ष फोडणे, ईडी लावण्यात तुम्ही व्यस्त आहेत. पण नवीन रोजगार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणता आला नाही. परंतु जे रोजगार महाराष्ट्रात आहे ते रोजगार देखील तुम्ही सांभाळू शकत नाही. एवढं नाकारते सरकार आहे. या सरकारच्या नाकारतेपणामुळे महाराष्ट्रातील ७ लाख युवकांच्या घरामध्ये चूल पेटणार होती. त्या युवकांच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचे काम या राज्यातील ट्रिपल इंजन सरकारने केले आहे. आज महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा या गद्दार सरकारने दिला आहे. असे महेबूब शेख यांनी सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना महेबूब शेख म्हणाले की, ट्रिपल इंजन सरकारच्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री आज कुठे आहे. ते एकेकाळी युवकांचे प्रदेशाध्यक्ष होते युवकांच्या समस्या काय आहे हे त्यांना माहित आहे. पण उद्योगमंत्री कोणत्या उद्योगात व्यस्त आहे की? त्यांना महाराष्ट्रातले उद्योग हे जात आहेत त्याच्याकडे त्यांच दुर्लक्ष आहे. ३७ कंपन्या आज गेल्या १५७ पैकी भविष्यात अजून जास्तीच्या कंपन्या देखील जाऊ शकतात. नेमक्या या कंपन्यांनला अडचण काय आहे. सत्ताधाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ह्या कंपन्या जात आहे का? या कंपन्यांची नेमकी अडचण काय आहे. ही मला वाटतं उद्योग मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातून स्थलांतरित होणाऱ्या या कंपन्या स्थलांतरण होण्यापासून थांबवाव्या पाहिजेत. पुण्यातून स्थलांतरित होणाऱ्या या कंपन्या राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार स्थलांतरणांपासून थांबू शकल्या नाही तर १० जून नंतर प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलन करू. या सरकारने जर युवकांच्या रोजगाराकडे लक्ष दिलं नाही. या कंपन्या थांबवल्या नाहीत. जर युवकांना बेरोजगारीच्या खाली ढकललं तर उद्याच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातला युवक तुम्हाला देखील बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही असेही महेबूब शेख यांनी म्हटले आहे.

मेहबूब शेख म्हणाले की, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरांमध्ये एकही नवीन प्रकल्प आणला नाही. पण त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात या कंपन्या सोडून जात आहे. यात मला वाटते की पूर्णपणे शंभर टक्के अपयश पालकमंत्री यांच्यासह या ट्रिपल इंजन सरकारचे देखील आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव मध्ये वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प सुरू होणार होता. ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र १ लाख ५८ हजार रुपयाची गुंतवणूक येणार होती. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प देखील राज्या येण्यापूर्वीच राज्याबाहेर पळवण्यात आला आहे. आज हिंजवडीच्या कंपन्या जात आहेत मला भीती याची वाटते की हळूहळू जर अशा कंपन्या महाराष्ट्र मधून निघून जायला लागल्या तर युवकाच्यावर बेरोजगारीची मोठी कुराड त्या ठिकाणी कोसळणार आहे. भविष्यात जर युवकांच्या हातातील रोजगार अशाच प्रकारे गेला तर महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळणार नसेल तर उद्या हा युवक गुन्हेगारीकडे आणि व्यसनाकडे जाईल याची मोठी भीती वाटत आहे. असे महेबुब शेख यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like