Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय!

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) हे पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये (Pune Court) हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले होते. यप्रकरणी मनोज जरांगे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच वॉरंट रद्द करताना कोर्टाने त्यांना 500 रुपयाचा दंड देखील ठोठावला आहे.

न्यायालयात हजर झाल्यानंतर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, न्यायालयाच्या समोर सर्व समान आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी न्यायालयात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने (Shivba Sanghatana) 2013 साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम 156 (3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले गोते. त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like