Nikhil Wagle | ३५०+ जागा? अशक्य… निवडणूक घोटाळा केल्याशिवाय हे शक्य नाही! – वागळे 

Nikhil Wagle On Exit Poll Results : मंगळवारी 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी, खाजगी दूरचित्र-वृत्तवाहिन्या आणि अन्य प्रतिनिधी संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA, लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं, बहुतांश अंदाजांमध्ये दिसून येत आहे. 272 जागांचा बहुमताचा टप्पा सहजी ओलांडत राष्ट्रीय लोकशाही आघाडी 543 सदस्यांच्या लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवू शकेल असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तवला आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकार 350 हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडि आघाडीला 125 ते 150 जागा मिळतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडी यांच्यात थेट लढत झाली आहे. सत्ताधारी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची आशा आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता पत्रकार निखील वागळे यांची प्रतिक्रिया आली आहे. देशातला मूड आणि exit polls अजिबात मेळ खात नाही. 2014-19 ला जनतेचा मूड वेगळा होता. यावेळी भाजप+च्या जागा कमी होतील असं वाटत होतं. पण 350+ जागा? अशक्य. निवडणूक घोटाळा केल्याशिवाय हे शक्य नाही! अशी पोस्ट करत त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like