Pakistan Cricket Team | पाकिस्तान संघ यंदा टी20 विश्वचषक जिंकणार? माजी प्रशिक्षक म्हणाले, “ते डार्क हॉर्स आहेत”

Pakistan Cricket Team | टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) आता फार दूर नाही. ही स्पर्धा 01 जूनपासून सुरू होणार आहे, मात्र अमेरिकेच्या वेळेत फरक असल्याने भारतातील स्पर्धा 02 जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी क्रिकेट तज्ज्ञ आणि दिग्गजांनी आपले अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मॅथ्यू हेडनने मोठा दावा केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन 2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा मार्गदर्शक बनला. याआधी ते 2021 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. आता 2024 टी20 विश्वचषकापूर्वी, हेडनने पाकिस्तानला ‘डार्क हॉर्स’, म्हणजे अनपेक्षित विजेता म्हणून वर्णन केले.

इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॅथ्यू हेडन म्हणाला, “विश्वचषकात पाकिस्तान नेहमीच डार्क हॉर्स राहिला आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्यासोबत त्यांचा वेगवान गोलंदाजी उत्कृष्ट आहे, जे गेल्या विश्वचषकात उपलब्ध नव्हते. मोहम्मद आमिर आणि हारिस रौफ यांच्यामुळे पाकिस्तान संघाची वेगवान गोलंदाजी फळी मजबूत बनते.”

हेडन पुढे म्हणाला, “बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि फखर जमान हे तीन मोठे खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण हे नेहमीच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. आशा आहे की यावर्षी ते त्यांची कामगिरी खराब करणार नाही. ते एक मजबूत संघ आहेत आणि स्पष्टपणे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये  सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील.”

2022 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान उपविजेता ठरला होता. 

उल्लेखनीय आहे की 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर हा संघ उपविजेता ठरला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झाला. इंग्लंडने हा सामना पाच गडी राखून जिंकून ट्रॉफी जिंकली. अशा स्थितीत पाकिस्तान या स्पर्धेत कितपत मजल मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी

You May Also Like