Pandharpur Vitthal Rukmini Temple : अडीच महिन्यानंतर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur Vitthal Rukmini Temple : पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी बंद केलेले विठ्ठलाचे पदस्पर्श आज पासून सुरू झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थिती विठ्ठल रूक्मिणीची नित्य पूजा संपन्न झाली त्या नंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन सूरू केले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी 15 मार्च पासून विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. तब्बल अडीच महिन्या नंतर आज पासुन भाविकांना पदस्पर्श सूरू केले. यामुळे विठुरायाचे सावळे रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

मंदिराला सातशे वर्षाचे मूळ रूप देण्यात आले आहे. हे मुळ रूप आज पहिल्यांदा समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांनतर पदस्पर्श दर्शन सुरू झाल्या ने भाविकांमधून आनंद व्यक्त केला आहे. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like