Pavana River : चिंचवड शहरात पवना नदी स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक मुक्तीचे प्रयत्न

Pavana River (विनायक आंधळे) :- चिंचवड शहरात उद्या रविवार दि.९ जून रोजी सकाळी पवना नदी घाट स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अभियान (Pavana River Ghat Cleaning and Plastic Freeing Campaign) राबवण्यात येत आहे. पवना नदीघाटानजीक अत्यंत गंभीर परिस्तिथी आहे, नदी प्रदूषणाच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी एकत्र आलेल्या शहरातील पर्यावरण सेवा विभाग आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीतील प्रमुख आयोजनात विविध संस्था, संघटना, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल म्हणून, पवना नदी घाट स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येणार आहे.

रविवार दि.९ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० दरम्यान शहरातील जाधव घाट वाल्हेकरवाडी, राममंदिर पूनावळे घाट, थेरगाव स्मशानभूमी घाट व भोंडवे मळा रावेत घाट या ठिकाणी हे अभियान राबवण्यात येणार आहे. सहभागी स्वयंसेवकांना सहयोगी संस्थेतर्फे हातमोजे देण्यात येणार आहेत, या उपक्रमात पर्यावरण प्रेमींनी, तसेच परिसरातील नागरीकांनी सहपरिवार, मित्रपरिवारा समवेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पवना नदीतील वाढत्या प्रदूषणावर, विशेषत: तिच्या घाटांवर, जे कचरा साचण्याचे, विशेषतः प्लास्टिकचे आकर्षण केंद्र बनले आहे. यावर नियंत्रण आणण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. वाहणारी पवना नदी प्लास्टिक कचरा आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे गंभीरपणे प्रभावित झाली आहे, ज्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि नदीच्या पर्यावरणास हानी पोहोचली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

 

You May Also Like