Pune Loksabha : इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप

Pune Loksabha : संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एनडीए सरकारच्या विजयात पुण्यातून (Pune Loksabha 2024) एका जागेची भर पडणार असल्याचेही एक्झिट पोलमधून दिसून आले आहे. तसेच स्थानिक भाजप नेत्यांकडून देखील विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्याकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली असून ३७० किलो पेढ्यांचे वाटप केले जाणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचं एक्झिट पोलमधून स्पष्ट झाल आहे. देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ४०० हून अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघ भाजपाकडून लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, दत्त मंदिर परिसर येथे नागरिकांसाठी एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ३७० किलो पेढे वाटले जाणार आहेत.

दरम्यान पुणेकरांना निकाल लाईव्ह पाहता येण्यासाठी भाजपाकडून एलईडी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी विजयोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like