Pune News | खुद्द महापालिका आयुक्तच वारकऱ्यांची आरोग्य सेवा करतात तेव्हा…

Pune News | संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावाने पुण्यनगरीत दाखल झाला आहे. यावेळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ रुग्णालय आणि सौ शीला साळवे ट्रस्ट यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या फिरता दवाखान्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे (Pune News) आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आरोग्य सेवा पुरवली. महापालिका आयुक्तांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करत, त्यांची विचारपूस करत त्यांना आवश्यक ते औषधोपचार दिले. आयुक्तांच्या या कृतीने वारकरी भारावून गेले. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भाव बघून आयुक्तांनाही पांडुरंगाचा आशिर्वाद मिळाल्याचा आनंद झाला.

यावेळी शीला साळवे ट्रस्टचे अविनाश साळवे व डॉक्टरांची टीम उपस्थित होती. गेल्या २४ वर्षांपासून वारकऱ्यांसाठी हा फिरता दवाखाना कार्यरत आहे. दहा सुसज्ज ॲम्बुलन्स, पाच दुचाकी ॲम्बुलन्स, तीनशे पेक्षा अधिक डॉक्टर, नर्स व स्वयंसेवकांची टीम लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like