Ram Kulkarni | एनडीएला जनतेंनी तिसर्‍यांदा सिंहासन दिले, यश पहावत नसेल तर राऊतांनी दिल्ली जाणं बंद करावं

Ram Kulkarni | तब्बल दहा वर्षे देशाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने सुव्यवस्थित केला म्हणुनच कालच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला देशातील मतदार जनतेंनी प्रचंड बहुमताने संधी देताना तिसर्‍यांदा सिंहासनावर बसवण्याचा जनादेश दिला. 293 आकडा फसवा असल्याची बतावणी करत संपादकिय लेख लिहिणार्‍या संजय राऊतांनी खरं पाहता जनादेशाचा अनादरच केल्याचा आरोप करत भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णींनी तुम्हाला एनडीएचं यश डोळ्यांनी पहावत नसेल तर दिल्लीत जाणं बंद करावं. एवढेच नव्हे तर ज्या नितीशकुमार आणि चंद्राबाबु नायडुंनी समर्थनाचं पत्र देवुन देखील तुम्ही आशा बाळगणं म्हणजे लहान लेकराने पुन्हा पुन्हा चॉकलेट देणार्‍यालाच मागणं या शब्दांत कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी खिल्ली उडवली.

संजय राऊतांनी सामना अग्रलेखातुन केलेल्या टिकेला उत्तर देताना राम कुलकर्णींनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील मतदार जनतेंनी तिसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या सिंहासनावर बसण्यासाठी संधी प्राप्त करून देताना बहुमताने अर्थात 293 जनादेश दिला. कदाचित तुम्हाला मान्य नसेल पण मतदारांनी दिलेल्या जनादेशाचे एनडीएनं स्वागत करत येणार्‍या चार-पाच दिवसात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा शपथविधी होईल. वास्तविक पहाता लोकसभा निवडणुक पुर्व रंगात एव्हाना मत मोजणी होताना देखील केंद्रात इंडिया आघाडी 300 पेक्षा जागा जिंकेल अशा मथळ्याखाली दोन-दोन हाताचे अग्रलेख राऊतांनी मुखपत्रात छापुन आणले. स्वप्नभंग झाल्यानंतर देखील नाक कापलं पण भोक कायम या उक्तीप्रमाणे तुम्ही छाती बदडुन घेताना दिसतात. चंद्राबाबु नायडु, नितेशकुमार वेगळा निर्णय घेतील म्हणुन तातडीने दिल्ली गाठली. अर्थात तुमचे कुबड्याप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या पाठोपाठ मात्र एनडीएतल्या सर्व घटक नेत्यांनी समर्थनाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताच सुकल्या तोंडाने माघारी मुंबईस्थित पोहोचलात. ज्या नितिशकुमार यांच्याकडून तुम्ही समर्थनाची आशा करता,त्याच नितिशकुमारांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर इंडिया आघाडीत घेताना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणुन देखील तुम्ही लोकांनी पसंती दिली नव्हती. त्याच नितिशकुमारांचं नाव सत्ता लालसेपोटी तुम्ही घेता, थोडी लाज वाटायला हवी या शब्दांत कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला.

एनडीएला मिळालेल्या बहुमताचा अर्थात 293 चा आकडा राऊतांनी फसवा म्हणणं याचाच अर्थ कोट्यावधी मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलचा दुष्ट नितीने अनादर करणं हा खरं तर देशातील मतदारांचा अपमान तो संजय राऊतांनी केल्याचा आरोप प्रवक्त्यांनी या पत्रकाद्वारे केला. तिसर्‍यांदा शपथविधी मोदी घेतात याचाच अर्थ नवा इतिहास देशाच्या राजकारणात आम्ही तुमच्या साक्षीने रचणार आहोत हे आता राऊतांनी लक्षात घ्यावं. भारतीय रूढी परंपरा, संस्कृती जतन करण्याचे व्रत आमचं आहे. ज्या हिंदुत्व विचाराला मुठमाती देवुन तुम्ही हिरव्या रंगात न्हालात त्यामुळे तुमच्या नसनसात आता अविचारीपणा घुसला ज्यामुळे तुम्हाला देशवासियांनी दिलेला जनादेश देखील सुयोग्य वाटत नाही. ज्याचा तुम्ही लिखाणाद्वारे अपमान करतात या शब्दांत भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी सामना लेखाला उत्तर दिले.नितिशकुमार, चंद्राबाबु नायडु यांच्या पाठिंब्यासाठी देव पाण्यात ठेवुन तुम्ही दिल्ली गाठली. मात्र या नेत्यांनी स्पष्ट भुमिका घेत आम्ही एनडीए सोबत असल्याचे ठणकावुन सांगितल्याबद्दल सुकल्या तोंडानी तुम्ही दिल्लीवरून परत आलात. एनडीएचं यश तुम्हाला पहावत नसेल तर दिल्ली जाणं बंद करा असं देखील कुलकर्णी यांनी म्हटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like