Raveena Tandon | अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेला शिवीगाळ व मारहाण? Video Viral

Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ (Raveena Tandon Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. X (Twitter) वर एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही लोक रवीनासोबत कसे वाद घालत आहेत आणि धक्काबुक्की करत आहेत, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच रवीनाच्या ड्रायव्हरने महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप व्हिडिओत करण्यात आला आहे. तसेच रवीनानेही वृद्ध महिलेला शिविगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

रवीना टंडनला जमावाने घेरले होते
माहिती देताना डीसीपी राजतिलक म्हणाले, ‘लग्नाच्या कार्यक्रमानंतर एक वृद्ध महिला आपल्या घराकडे जात होती. त्याचवेळी रवीना टंडन ज्या कारमध्ये बसली होती, त्या गाडीचा चालक मागे सरकत होता आणि अशा स्थितीत तिच्या चुकीमुळे ही महिला कारला धडकली. या घटनेनंतर वृद्ध महिलेला राग आला आणि तिने रवीना टंडनच्या ड्रायव्हरला विचारले की तो तिच्यावर गाडी चालवणार का?

चालकावर मारहाणीचा आरोप
यानंतर वृद्ध महिला आणि रवीनाचा ड्रायव्हर यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. यानंतर दोन्ही पक्ष नजीकच्या खार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांनी तक्रार न देण्याचा निर्णय घेत आपापल्या घरी गेले.

मुंबईतील वांद्रे परिसरातील घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून दोन्ही बाजूंनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. रवीना टंडन तिच्या ड्रायव्हरसोबत घरातून निघाली असताना एक कुटुंब रस्त्याने चालले होते आणि त्यांची कार एका महिलेजवळ आली, यामुळे संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ सुरू केला, ज्याचा व्हिडीओही बनवण्यात आला आणि असा दावा करण्यात आला रवीनाच्या ड्रायव्हरने महिलेच्या कुटुंबियांना मारहाण केली होती.

रवीनाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही
पोलिसांनी केलेल्या तपासात हे दावे खोटे आढळले. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तक्रार दाखल झाली नाही. याप्रकरणी रवीना टंडनकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

You May Also Like