‘त्या’ कॉंग्रेस आमदारासह हसणाऱ्या सर्व आमदारांचे निलंबन करून निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घाला

मुंबई : गुरुवारी कर्नाटक राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. ‘तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,’ असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितलं की, ‘एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.

या संतापजनक प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत रमेश कुमार यांच्यासह हसणाऱ्या त्या सगळ्या आमदारांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.

‘कर्नाटक काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि आमदार विधानसभेच्या सभागृहात म्हणतात की ‘जर बलात्कार रोखता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या’ यावर कळस म्हणजे भाजपचे विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी याचा विरोध करण्याऐवजी ते देखील या वक्तव्यावर हसत होते. काय म्हणायचं या विकृत मानसिकतेकला?? स्त्रीवर बलात्कार होणे हा एखाद्याच्या करमणुकीचा भाग कसा असू शकतो?? लोकप्रतिनिधी जर अशी मतं मांडत असतील तर या मानसिकतेचे प्रतिनिधी निवडून देताना सुद्धा जनतेने डोळे उघडे ठेऊन विचार केला पाहिजे.’ असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

 

तर, ‘या वक्त्यव्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. रमेश कुमार यांच्यासह या वक्त्यव्यावर हसणाऱ्या सर्व आमदारांचे निलंबन करून त्यांना निवडणूक लढवण्यावर देखील आजन्म बंदी घातली पाहिजे.’ अशी मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

You May Also Like