Devendra Fadnavis | शरद पवारांना लक्षात आलंय आता हवा अजितदादांची वाहू लागलीय, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

Devendra Fadnavis | बारामतीच्या सभेनंतर शरद पवारांच्या लक्षात आलंय आता हवा अजितदादांची वाहू लागलीय,म्हणून ४ तारखेनंतर छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असे वक्तव्य त्यांनी केले.कॉग्रेस बुडती नाव आहे,त्यात बुडण्यापेक्षा शरद पवारांनी अजितदादांसोबत आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेसोबत जावे, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना दिला. महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड म्हणजे छोटा महाराष्ट्र आहे. सर्व राज्यातील लोक इथे राहतात, आमदार लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी विकासातून या भागाचा कायापालट केला आहे. रेड झोन बंदी उठवणे, आंद्र प्रकल्पाचे पाणी आणणे, पीएम आवासची २० हजार लोकांना घरे देणे, शास्तीकर रद्द करणे, कचरा प्रक्रीया प्रकल्प उभा करणे असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सर्व साध्य करण्यासाठी मोदींना पाठबळ देण्यासाठी आढळऱावांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हेंचा सिनेमा, नाटक सर्व फ्लॉप झालंय, म्हणून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली, ते केवळ नाटकंच करतात आणि जनतेला विसरुन जातात असा टोलाही त्यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray : जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

Murlidhar Mohol : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही- मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा

You May Also Like