Raveena Tandon | “..तर तिची ठेचून हत्या झाली असती”; रवीना टंडनच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

नुकताच अभिनेत्री रवीना टंडन चा एक व्हिडिओ (Raveena Tandon Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात रवीनाने वृद्ध महिलेला शिविगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही लोकांनी म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित संताप व्यक्त केला.

शनिवारी रात्री वांद्रे इथल्या कार्टर रोडवर ही घटना घडली. स्थानिकांनी रवीनाच्या (Raveena Tandon) कारला घेराव घातल्यानंतर तिने बाहेर येऊन जमावाशी बोलण्याचा प्रयत्न केला. “कृपया मला मारू नका, माझ्या ड्राइव्हरला मारू नका”, अशी ती विनंती करताना व्हिडीओत दिसून येत आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली, ‘रवीना टंडनजींसोबत जे घडलं, ते खूपच चिंताजनक आहे. विरुद्ध गटात आणखी पाच-सहा लोक असते तर तिची ठेचून हत्या झाली असती. अशा रोड रेजच्या उद्रेकाचा आम्ही निषेध करतो. अशा लोकांना फटकारलं पाहिजे. त्यांनी अशा पद्धतीने हिंसक आणि विषारी वागू नये’, असं कंगनाने लिहिलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like