Arvind Kejriwal | ‘…तर उद्धव ठाकरे तुरुंगात दिसतील’, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. काल केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर मुख्यमंत्री आज हनुमान मंदिरात पोहोचले. त्यांनी पत्नी सुनीता आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. सीएम केजरीवाल यांनी आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टालिन तुरुंगात दिसतील” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. “यांनी भाजपाच्या एका नेत्याला सोडलं नाही. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण संपवलं. हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray : जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

Murlidhar Mohol : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही- मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा

You May Also Like