Aaditya Thackeray | वर्ल्डकपची फायनल मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा, आदित्य ठाकरेंनी BCCI ला डिवचलं!

Aaditya Thackeray | वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया 04 जुलै रोजी सकाळी भारतात पोहोचली. यावेळी चाहत्यांनीही भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली जिथे लाखो चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले आणि टीम इंडियाने ट्रॉफीसह विजयी परेडमध्ये भाग घेतला. यावेळी एक विलक्षण नजारा पाहायला मिळाला. याच मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.

भारतीय संघाच्या खेळाडुंनी ज्या ओपन डेक बसमधून काढण्यात आली ती बस गुजरातची असल्याने विरोध संतापले होते. यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी एक ट्विट करुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) टोला लगावला आहे. कालचं मुंबईतील सेलिब्रेशन हा बीसीसीआयसाठी एक ठळक संदेश होता. विश्वचषक स्पर्धेची फायनल कधीही मुंबईबाहेर ठेवू नका, हे बीसीसीआयला कळाले असेल, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like