Umesh Patil | बाबासाहेब यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या भगेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करा

Umesh Patil | मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केली आहे.

महाडमध्ये स्टंटबाजी करणं आव्हाडांना महागात पडणार! अजित पवार गटाकडून अटकेची मागणी

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास विरोध दर्शवताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ जात त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडून खाली फेकला. त्यांच्या या कृतीवरून अजित पवार गट प्रचंड आक्रमक झालं आहे.

महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार आहेत असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर शरद पवार तुम्ही काय कारवाई करणार आहात याचे उत्तर आंबेडकरी जनतेला दिले पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like