Vasant More शिवसेनेकडून विधानसभा लढवणार! मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Vasant More : देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली आहे. यादरम्यान वसंत मोरे (Vasant More Meets Uddhav Thackeray) हे विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी पुन्हा ठाकरेंशी हात मिळवणार असल्याची चर्चा आहे.

वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी कडून पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. यानंतर आता विधानसभेपूर्वी वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडण्याची चिन्हे दिसत आहेत. वसंत मोरे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही समजते. पुढील आठवड्यात 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यास वसंत मोरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like