Kundlik Khande | पंकजा मुंडेंना धोका दिल्याचा आरोप असणाऱ्या कुंडलिक खांडेविरोधात गुन्हा दाखल

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत.

सोबतच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत.

यातच आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे समर्थक वाल्मीक कराड यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली त्यावरून बीड जिल्हा शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांच्यावर परळीत गुन्हा दाखल झाला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like