Ajit Pawar | प्रती दिंडी २० हजारांचा निधी, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना होणार

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय मोठ्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी अजित पवारांनी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल….म्हणत अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली.

मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी दिली. निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यामातून वारकऱ्यांची आरोग्य तापसाणी करणार. तसेच प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याची माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like