Jayant Patil | आणि जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले खडेबोल

Jayant Patil | हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे ढकलत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत जयंत पाटील यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीस यांना चोख उत्तर देत त्यांना सुनावले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

जयंतराव,
खोटे बोलायचे तरी किती?
बाकीच्यांनी खोटा नरेटिव्ह पसरविला, तर समजू शकते. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे?
महाविकास आघाडीचा काळ आठवून पहा…
2020-21 : 1,82,454 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
2021-22 : 2,19,573 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
आणि आता
2022-23 : 2,52,389 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)
आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलतीलच.
पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, ही अपेक्षा!

त्याला जयंत पाटील यांचे उत्तर

देवेंद्रजी,

मोठ्या व मध्यम राज्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या २-३ मध्ये असायचा. भाजपची राजवट २०१४-१५ ला आली व आपण मुख्यमंत्री झालात फक्त २ वर्षात २०१७-१८ मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला व तो कायम पुढे राहिला आहे व हा NARRATIVE नाही तर ही अख्या महाराष्ट्राची खरी खंत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like