Fair Price Shop Licenses | रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

Fair Price Shop Licenses | अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात २० ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले आहे.

परिमंडळ अधिकारी ब कार्यक्षेत्रात वानवडी गाव आणि गुलटेकडी येथील डायस प्लॉट, क कार्यक्षेत्रात शिवाजीनगर येथील रामोशीवाडी, फ कार्यक्षेत्रात चऱ्होली गावठाण, साई नगरी आळंदी रोड, ताम्हणे वस्ती टॉवर लाईन, भारतमाता नगर, दिघी चक्रपाणी वसाहत आणि गंधर्व नगरी मोशी, ह कार्यक्षेत्रात पर्वती पायथा, ल कार्यक्षेत्रात कोथरूड येथील शास्त्रीनगर तर परिमंडळ म कार्यक्षेत्रात रहाटवडे, कुडजे, खेड, शिवापूर, आर्वी, श्रीरामनगर, मणेरवाडी, धायरी आणि बावधन अशा २० ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा  (Fair Price Shop Licenses)जाहीरनामा १ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास असा स्वस्त धान्य दुकानाचा प्राथम्यक्रम असेल. अर्ज केलेल्यांची आर्थिक स्थिती किमान ३ महिन्यांचे धान्य उचलण्याइतकी सक्षम असावी.

जाहीरनामा काढलेल्या ठिकाणांसाठी करावयाचे अर्ज संबंधित परिमंडळ अधिकारी कार्यालयात ५ रूपये शासनजमा करून उपलब्ध होतील. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी ३१ जुलैपर्यंत संबंधित परिमंडळ कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण कार्यालयाने कळविले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like