Nitish Kumar | एनडीएच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांच्या पक्षाने बिहारसाठी केली मोठी मागणी, NDAमध्ये तणाव वाढणार?

Nitish Kumar | 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि त्यासोबतच जल्लोषही सुरू झाला. बिहारला विशेष दर्जा मिळायला हवा, असे मुख्यमंत्री नितीश कुमार  यांच्या पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे. जेडीयूचे प्रवक्ते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी बुधवारी (05 जून) ही मागणी केली.

केसी त्यागी म्हणाले की, आज दिल्लीत एनडीएची बैठक आहे. यामध्ये सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे. यात नितीश कुमारही सामील होत आहेत. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याच्या समर्थनार्थ जेडीयूकडून पत्रही देण्यात येणार आहे. या प्रश्नावर इंडिया आघाडीशी काही संपर्क किंवा चर्चा झाली आहे का? यावर केसी त्यागी म्हणाले की, ती वेळ निघून गेली आहे. परत जाण्याचा प्रश्नच येत नाही.

‘…तर आज आपण इथे नसतो’
केसी त्यागी म्हणाले की, मल्लिकार्जन खर्गे आणि त्यांच्या पक्षाने मोठे मन दाखवले असते, तर आज आपण येथे पोहोचलो नसतो. त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्ही येथे आलो आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढल्याचे जनता दलाने स्पष्ट केले आहे. सर्वच कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांसाठी विशिष्ट पदांची इच्छा आणि अपेक्षा असते, जे चुकीचे नाही.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील : केसी त्यागी
या प्रश्नावर एनडीएकडून काही मागणी आहे का? त्यावर केसी त्यागी म्हणाले की, आम्ही कोणत्याही अटीशिवाय एनडीएला पाठिंबा देतो, मात्र बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणे जनहिताचे आहे. त्याशिवाय बिहारचा विकास (Nitish Kumar) अशक्य आहे. 293 क्रमांक हा इंडिया आघाडीऐवजी एनडीए आघाडीकडे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like