चॅम्पियन Team India चे विमानतळावर जोरदार स्वागत, पंतप्रधान सकाळी 11 वाजता खेळाडूंना भेटतील

भारतीय संघ (Team India) गुरुवारी सकाळी सहा वाजता बार्बाडोसहून नवी दिल्लीला पोहोचला. बेरील चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू ब्रिजटाऊनमध्ये तीन दिवस अडकून पडले होते. बुधवारी विशेष चार्टर्ड फ्लाइटद्वारे भारतीय खेळाडूंना देशात आणण्यात आले.

नवी दिल्ली विमानतळावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे (Team India) जंगी स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती. सर्वांनी भारतीय संघाचे मनापासून स्वागत केले. रात्रीच अनेक चाहते विमानतळावर पोहोचले होते.

विराटला पाहताच चाहत्यांनी ओरडायला सुरुवात केली
संघाचे खेळाडू विमानतळाबाहेर आले आणि बसने हॉटेलकडे रवाना झाले. दरम्यान, विराट कोहली बसमध्ये चढत असताना त्याने चाहत्यांच्या दिशेने पाहत त्यांचे अभिवादन स्वीकारले. विराट कोहलीला पाहताच चाहत्यांनी ओरडायला सुरुवात केली.

ही टीम पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे
ही टीम आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहे. त्यानंतर ते आजच मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान खुल्या बसमधून ही टीम आज रोड शो करणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम उद्या होणार होता. पण खेळाडूंना त्वरीत मुक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आजच होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like