Chandrababu Naidu | चंद्राबाबू नायडू घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; पहा कोण कोण असणार उपस्थित

तेलुगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) येत्या बुधवारी 12 जूनला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास विजयवाडाजवळ हा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचे वरिष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशच्या शेजारील राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये राज्याचं विभाजन झाल्यानंतर नायडू (Chandrababu Naidu) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही दुसरी वेळ असेल. तेलगू देसम पक्ष, जनसेना आणि भारतीय जनता पक्षानं आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175 पैकी 164 जागांवर विजय मिळवत विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.

दरम्यान, काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकारस्थापनेचा दावा सादर केला. नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी होणार आहे. राष्ट्रपती संध्याकाळी सव्वासात वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. तत्पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेऊन मोदी यांची भाजपा संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं पत्र सादर केलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like