Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांना समर्थन दिल्याने छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती दहन केल्यापासून राज्यातील वातावरण तापले आहे. आव्हाड यांनी यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आव्हाड यांच्याकडून अनावधानाने ही चूक घडली असून त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

भुजबळ यांनी आव्हाड (Jitendra Awhad) याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे. या निमित्ताने आता मुश्रीफ आणि भुजबळ यांच्यातच जुंपली आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पत्रक फाडलं हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून आव्हाड यांना पाठिंबा देण्याचं विधान भुजबळ यांनी केलं हे अत्यंत दुर्देवी आहे. भुजबळांनी आव्हाड यांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवं होतं, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like