Team India procession | टीम इंडियाच्या मिरवणूक बसवरुन वाद, गुजरातवरुन बस बोलावल्याने संतापले विरोधक

Team India procession | भारतीय संघाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती आणि आज म्हणजेच 4 जुलै रोजी टीम इंडिया आपल्या देशात परतली.

भारतीय संघ मायदेशी परतताच दिल्ली विमानतळावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ITC मौर्या हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडिया थेट पीएम मोदींना भेटायला गेली. दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान टीम इंडियाच्या मिरवणूक बसवरुन वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मिरवणूक (Team India procession)काढण्यासाठी गुजरातवरुन बस बोलावल्याने विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे.

‘बेस्टच्या ताफ्यात खुल्या ज्या बसेस आहेत त्या सगळ्या चांगल्या बसेस आहे. महाराष्ट्राचं सरकार गुजरात धार्जिणे आहे. त्यांना ते आका म्हणतात. भारतीय टीमसाठी गुजरातमधून बस आणली आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचे अपमान करण्याचा प्रयत्न आहे’, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपेक्षा घेतला आहे.

तर, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या बसवर आक्षेप घेतला आहे. ‘भारतीय खेळाडू यांचं आम्ही स्वागत करतो. पण मुख्य गोष्ट अशी आहे की, महाराष्ट्रामध्ये मिरवणूक काढण्यासाठी गुजरातमधून बस का बोलावली आहे’, असा सवालही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी उपस्थितीत केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like