Ashok Chavan | ‘हार के बाद चैन से कभी बैठा नहीं’, खा. अशोक चव्हाणांचे चोख प्रत्युत्तर

नांदेड लोकसभेतील भाजपच्या पराभवावरून लक्ष्य करू पाहणाऱ्या विरोधकांना खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज राज्यसभेत खडे बोल सुनावले. ‘जीत पर कभी अहंकार किया नही, किसी हार पर कभी रोया नही, लेकीन हर हार के बाद, मैं चैन से कभी बैठा नहीं’ या शब्दांत त्यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत काल विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी खा. अशोक चव्हाण यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर खा. चव्हाण यांनी आज सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, काहींना नांदेड जिल्ह्यात फारच स्वारस्य आहे. मात्र, त्या खासदारांच्या स्वतःच्या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समितीचा उमेदवार सुद्धा निवडून येत नाही. मी मात्र अनेकदा जागा निवडून आणल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा फक्त नांदेड व हिंगोलीची जागा निवडून आली होती. त्यात माझे छोटे का होईना पण योगदान निश्चितपणे होते.

उल्लेखनीय म्हणजे खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकि‍र्दीचा उल्लेख केला. त्यावेळी सुद्धा काही खासदारांनी ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यालाही खा. चव्हाण यांनी तात्काळ उत्तर दिले. ते म्हणाले, होय मी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलो होतो व त्याचा मला गर्व होता.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत त्यांनी अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केले. संविधान बदलाबाबतचा अपप्रचार खोडून काढताना १९७३ च्या ऐतिहासिक केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी संविधानाच्या मूळ गाभ्याला बदलण्याचा अधिकारच संसदेला नसल्याचे स्पष्ट केले. ‘नीट’सारख्या प्रवेश प्रकिया आणि नोकर भरती प्रक्रियेतील गैरप्रकार कठोरतेने रोखले पाहिजे, याबाबत कोणाचेही दूमत नाही. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या संकल्पपत्रात सुद्धा यासाठी कठोर कायदा करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. आता झालेल्या गैरप्रकारांची सीबीआय चौकशी सुरू असून, आरोपींवर कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like