Hathras News | त्या चमत्कारिक मातीत असे काय होते, ज्यामुळे हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली?

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील (Hathras News ) सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संगात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीपी आणि गृह सचिव घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. आता या अपघाताबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे.

ही मोठी माहिती समोर आली आहे
या अपघाताच्या (Hathras News ) चौकशीत समोर आले आहे की, बाबा ज्या मातीत पाय ठेवतात त्या मातीला भाविक पवित्र मानतात. ती माती घरी आणल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. महिला साडीच्या पदरात ती माती बांधून घेऊन घरी जातात. बाबांच्या मार्गावर रांगोळी सजवली जाते. त्या रांगोळीच्या रंगांची धूळ स्त्रियाही आपल्या पदरात बांधतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. या चमत्कारिक मातीला जमा करण्यासाठीच लोकांची झुंबड उडाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

सर्वाधिक मृत्यू महिलांचे झाले आहेत
पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघाताबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह म्हणाले, ‘या अपघातात 127 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यामध्ये 7 मुले आणि 1 पुरुष वगळता सर्व मृतांमध्ये महिला आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिलाही रडताना दिसत आहेत. सत्संगासाठी दूरदूरच्या ग्रामीण भागातील महिला आल्या होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like