Jayant Patil | “त्यांनी त्यांच्या कृतीबद्दल माफी मागितली”, जितेंद्र आव्हाडांच्या बचावात पुढे आले जयंत पाटील

Jayant Patil | बुधवारी महाड येथे मनुस्मृतीच्या प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी आव्हाडांना धारेवर धरले आहे. अशातच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) आव्हाडांच्या बचावात पुढे आले आहेत.

जयंत पाटील ट्विट करत म्हणाले, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली पस्तीसहून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे संपूर्ण राजकीय व सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापले आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा व प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही.

आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचे पोस्टर नकळतपणे फाडले गेले. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like