Guru Randhawa | मला आवडते… गुरु रंधावा शहनाज गिलला करतोय डेट? डेटिंगच्या चर्चांवर गायकाने तोडले मौन

आजकाल गुरु रंधावा (Guru Randhawa) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या आणि शहनाज गिलच्या डेटिंगच्या अफवा गेल्या एक वर्षापासून सुरू होत्या. दोघेही एकमेकांसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. लोक त्यांच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षावदेखील करतात. तरीही दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नव्हते. पण आता गुरूने डेटिंगच्या बातम्यांवर मौन तोडले आहे.

जेव्हा गुरुला विचारण्यात आले की तो खरोखर शहनाजला डेट करत आहे का? उत्तरात गुरूने सांगितले की, डेटिंगच्या बातम्यांमुळे त्याच्याकडे जे लक्ष वेधले जात आहे त्याचा तो आनंद घेत आहे आणि लोक त्याच्याबद्दल बोलत आहेत हे चांगले वाटते. गुरू म्हणाला, “जेव्हा लोक माझ्या डेटिंग लाइफबद्दल बोलतात ते मला आवडते.” हसत हसत तो पुढे म्हणाला, “चाहते माझे नाव जगभरातील सुंदर मुलींशी जोडत आहेत. मला ते आवडते, प्रत्येक मुलाला अटेंशन हवे असते.”

अफवा कधी सुरू झाल्या>
गुरूने (Guru Randhawa) शहनाजचे नाव घेतले नसले तरी. पण त्याला नावे जोडणे आवडते, असे त्याने कबूल केले. वास्तविक, गेल्या वर्षी जेव्हा शहनाजचा म्युझिक व्हिडिओ आणि तिचा रोमँटिक ट्रॅक ‘सनराईज’ रिलीज झाला तेव्हा त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. यानंतर या दोघांबद्दल अशा अफवा उडू लागल्या. यासोबतच गुरूने असेही सांगितले की, लोकांनी त्याच्याबद्दल बोलत राहावे अशी त्याची इच्छा आहे. तो म्हणाला, “मी सध्या कुणालाही डेट करत नसलो तरी, या बातमीमुळे मी लवकरच कुणालाही डेट करू शकेन.”

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गुरूने ‘इशारे तेरे’, ‘नच मेरी रानी’, ‘हाय रेटेड गब्रू’, ‘सूट पटियाला’ यांसारखी अनेक अप्रतिम पंजाबी गाणी गायली आहेत. शहनाज गिल अभिनेत्रीसोबतच गायिकाही आहे. त्यांनी अनेक गाणीही गायली आहेत. सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’मध्येही ती दिसली होती. नुकतेच तिचे ‘धूप लगडी’ हे गाणे रिलीज झाले. याला खूप चांगले व्ह्यूज मिळत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like