Eknath Shinde | लातूर जिल्ह्यातील हणमंत जवळगा येथील पाणी टंचाईची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून तातडीने दखल

CM Eknath Shinde: लातूर जिल्ह्यातील हणमंत जवळगा (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने दखल घेतली असून त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडून दूरध्वनीद्वारे याबाबतच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच या गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

हणमंत जवळगा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची जलवाहिनी काही व्यक्तींनी फोडल्याने हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालय येथे आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच हणमंत जवळगा गावातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या, तसेच असे प्रकार पुन्हा होवू नयेत, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन