Indian team | ‘डोळ्यात आनंदाश्रू, अभिमानाने छाती फुगली;’ भारतीय खेळाडूंचा फ्लाइटमधील व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

भारतीय संघ  (Indian team) गुरुवारी बार्बाडोसहून मायदेशी परतला. भारतीय संघाचे विमान सकाळी सहा वाजता नवी दिल्ली विमानतळावर उतरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले, त्यानंतर खेळाडूंना हॉटेल आयटीसी मौर्य येथे नेण्यात आले. टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकणारा भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे.

यानंतर, भारतीय खेळाडू मुंबईला रवाना होतील, जिथे ते संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राइव्हवर विजयी परेडमध्ये चाहत्यांसोबत विजेतेपदाचा आनंद साजरा करतील. भारताने 17 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघ जेतेपद पटकावल्यानंतर तीन दिवस बार्बाडोसमध्ये अडकला होता. याचे कारण होते बार्बाडोसमधील हरिकेन बेरिल चक्रीवादळ आले होते.

बीसीसीआयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
भारतीय संघाला (Indian team) विशेष चार्टर्ड विमानाने मायदेशी आणण्यात आले. दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. बोर्डाने चाहत्यांसह व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी फ्लाइटमध्ये केलेली मजा दाखवली आहे आणि टी20 विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांना कसे वाटते हे देखील शेअऱ केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like