Jasprit Bumrah | बुमराहच्या मुलाला कडेवर उचलून घेत पंतप्रधानांनी दिली पोझ, फोटो होतोय प्रचंड व्हायरल

Jasprit Bumrah | भारतीय संघाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती आणि आज म्हणजेच 4 जुलै रोजी टीम इंडिया आपल्या देशात परतली.

भारतीय संघ मायदेशी परतताच दिल्ली विमानतळावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ITC मौर्या हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडिया थेट पीएम मोदींना भेटायला गेली. यावेळी मोदींनी भारतीय संघासोबत गप्पा मारल्या. बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंचे कुटुंबीयही यावेळी पंतप्रधान मोदींना भेटले.

यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदचीही मोदींशी भेट घडवून आणली. यावेळी मोदींनी अंगदला कडेवर उचलून घेत सर्वांचेच मन जिंकले. बुमराह कुटुंबासोबतचा पंतप्रधानांचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधतोय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like