Jitendra Awad | आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा…; अजित पवार गट आक्रमक

Jitendra Awad | राज्य सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महाड येथील चवदार तळ्याजवळ जात त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडून खाली फेकले. त्यांच्या या कृतीवर जोरदार टीका होत आहे.

यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. जाहीर निषेध! जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, असं ते म्हणालेत.

डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like