Jitendra Awad | महाडमध्ये स्टंटबाजी करणं आव्हाडांना महागात पडणार! अजित पवार गटाकडून अटकेची मागणी

Jitendra Awad | राज्य सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महाड येथील चवदार तळ्याजवळ जात त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडून खाली फेकला. त्यांच्या या कृतीवरून अजित पवार गट प्रचंड आक्रमक झालं आहे.

याबाबत आनंद परांजपे म्हणाले की, महाड येथील चवदार तळ्याजवळ जे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केले. ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नौटंकीकार आणि नकलाकार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आहेत. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर त्यांनी फाडला. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबत आंदोलनात दिसणारे जे आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक करावी अशी मागणी आमची आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like