Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी केला आंबेडकरांचा अपमान, शिवसेना पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन

बुधवारी महाड येथे मनुस्मृतीच्या प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आंदोलनावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला. याच कृत्याच्या निषेधार्थ पुण्यातील सारसबाग चौकात शिवसेना पुणे शहराच्या वतीने जितेंद्र आव्हाडांचा (Jitendra Awhad) पुतळा जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले.

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, सह संपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या शहर प्रमुख सुरेखा पाटील आणि श्रुती नाझीरकर, उपशहर प्रमुख गौरव साइनकर, विधानसभा प्रमुख निलेश जगताप, विभाग प्रमुख निलेश धुमाळ, उपशहर संघटक प्रसाद बेल्हेकर, राजाभाऊ परदेशी, ध्रुव नागुल, आकाश गायकवाड उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like