Sanjay Raut | कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण; संजय राऊत म्हणाले, “मला त्यांच्याबद्दल सहानुभूती, मात्र…”

Sanjay Raut | बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपाची नवनिर्वाचीत खासदार कंगना राणौत हिच्यासोबत चंदीगड विमानतळावर गुरुवारी दुपारी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. CISF च्या लेडी कॉन्स्टेबलने कंगनाला चक्क कानशिलात लगावल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. दिल्लीला जाण्यासाठी बोर्डिंग करण्यापूर्वी ती सुरक्षा तपासणीसाठी उभी असताना ही घटना घडली. आरोपी महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला निलंबित करून ताब्यात घेण्यात आले आहे.

“संबंधित महिला शिपाईने सांगितलं की त्यांची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. त्यामुळे आपल्या आईबाबत कुणी चुकीचं बोललं असेल राग येणं स्वाभाविक आहे. खरं तर कोणीही कायदा हातात घेऊ नये. मात्र, त्या महिला शिपाईने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला आहे. भारत माता तिची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले होते ते भारत मातेचे पुत्र होते, त्यामुळे जर कोणी भारत मातेचा अपमान केला असेल आणि त्यामुळे कोणाला राग आला असेल, त्याचा आपण विचार करायला हवा”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

“मला कंगना रनौतबद्दल सहानुभूती आहे. त्या आता खासदार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे खासदारांवर कोणीही हात उगारू नयेत. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांचा सन्मानही राखला गेला पाहिजे. खरं तर या घटनेनंतरही शेतकऱ्यांच्या मनात भाजपाविषयी किती राग आहे, हे स्पष्ट होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like