Loksabha Election Results | संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही; भाजप नेत्याची कबुली

लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Loksabha Election Results) जनतेने भाजपा आणि एनडीए ला स्पष्ट बहुमत दिले आहे. महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाचे नॅरेटिव्ह दुर्दैवाने आम्ही तोडू शकलो नाही. महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट, धार्मिक ध्रुवीकरण आणि सहानुभूतीच्या आधारावर राज्यात विरोधकांना यश मिळाले अशी भावना भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, उबाठा गटाचे कार्यकर्ते “बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना” च्या उक्तिनुरूप आनंद साजरा करत आहेत. मृतप्राय काँग्रेसला जीवनदान देण्याचं काम करणाऱ्या उबाठा नेतृत्वाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे काय म्हणत असतील? बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेतून शिवसेनेची स्थापना केली त्याचा उद्धव ठाकरेंना विसर पडला. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसला लाभ पोहोचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काम करावं लागले आणि स्वतः काँग्रेसला मतदान देखील केलं. उद्धव ठाकरेंनी ही विचारधारा का स्वीकारली याचं उत्तर त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावं लागेल. आम्ही महाराष्ट्रातल्या निकाला संदर्भाने आत्मचिंतन आणि मूल्यांकन नक्की करू.

महाराष्ट्रात एवढ्या विपरीत परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी आघाडी (Loksabha Election Results) घेऊन विजय निश्चित केला आहे. नागपुरातील या विजयाबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत भाजपा व मित्रपक्ष केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास शेवटी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like