Maharashtra Budget 2024 | राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून ‘शेतकरीराजा’ला काय मिळालं? वाचा सविस्तर

विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) मांडत आहेत. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे महिला,शेतकरी, तरुण अशा विविध समाज घटकांना खूष करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान अजित पवारांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या? पाहूयात (Maharashtra Budget 2024)
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार
गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील
कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार
‘गाव तिथं गोदाम’ योजनेसाठी 341 कोटींची तरतूद करणार
शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होण्यासाठी ‘मागेल त्याला सौर ऊर्जा पंप’ देणार, 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळणार
राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करणार
गोसेखुर्द धरणातून 25 टीएमसी पाणी वळवण्याचे नियोजन
वन्य प्राणांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like