Mahesh Tapase | शिंदे व पवार यांच्या राजीनामासाठी देवेंद्र फडणवीस यांचे राजीनामा नाट्य

Mahesh Tapase | देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी व संविधान मांणाऱ्या नागरिकांनी भाजपाला त्याची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रात भाजप ४५ पार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनाच स्वतःचा राजीनामा पुढे करण्याची वेळ आली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही, महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले हे लक्षात आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी सुरू केली आहे. वास्तविक भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे., असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही हे फडणवीस यांच्या लक्षात आल्यामुळे मीच राजीनामा देतो असे राजीनामा नाट्य फडणवीस यांनी सुरू करून शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला असेही महेश तपासे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे अजित पवार यांच्या उमेदवारांना जागा देण्यापेक्षा स्वबळावर लढावे असा विचार फडणवीस यांना येत असावा असेही तपासे म्हणाले.

बाप बाप होता है
शरद पवार यांचा कार्यकाळ संपला व त्यांनी घरी बसून कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावे असे विधान करणारे अजित पवारांचा आवाज मतदारांनी बंद केला आहे. एकीकडे ४० आमदार सोबत असूनही एकच खासदार निवडून येतो तर दुसरीकडे ८४ वर्षाच्या योद्धाचा स्ट्राईक रेट हा ८०% आहे कारण बाप तो बाप होता है पंगा नही लेना असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like