Mohan Joshi | ‘अब की बार जनता ने किया चमत्कार’..! इंडिया आघाडीचे अभिनंदन

Mohan Joshi | देशातील लोकसभा निवडणुकीत गोदी मीडियाने सत्ताधार्‍यांना अनुकूल असे एक्झिट पोल दाखविल्यावरही देशातील जनतेने काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली जो निकाल दिला, त्याबद्दल मी जनतेचे अभिनंदन करतो. ‘अब की बार जनता ने किया चमत्कार’ असेच यावर म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिली.

तसेच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे, संघटितपणे ही निवडणूक लढवून यश संपादन केल्याबद्दल काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सरकारचा गेली दहा वर्षे हुकूमशाहीचा कारभार आपल्या देशात सुरू होता. त्याला चाप बसविण्याचे काम जनतेने या निवडणुकीत केले, ही लोकशाही व संविधान टिकवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने चौफेर यश मिळविले, हे कौतुकास्पद आहे. एमआयएम अथवा वंचित आघाडीचे उमेदवार भाजपने उभे केले. मात्र, त्यांच्या या कूटनीतीला जनतेने काहीच प्रतिसाद दिला नाही, हीदेखील नोंद घेण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.

पुण्यातही महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार लढत दिली. भाजपच्या दृष्टीने ही काळजीची बाब ठरली होती. यामध्ये विजय नाही मिळाला तरीदेखील जनसेवेचे कार्य सुरूच राहील. पुणेकरांना अधिकाधिक चांगले जीवनमान जगण्याची संधी मिळावी, यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी हे उत्तमरीतीने काम करीत राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like