Narendra Modi | विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यासाठी देशाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा खोटा प्रचार केला

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDAच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी भाजपाचे नेते, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड करण्यात आली. NDAच्या संसदीय पक्षाची बैठक, काल दुपारी नवी दिल्लीतल्या जुन्या संसदेच्या अर्थात संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी, NDAच्या संसदीय पक्ष नेतेपदी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावला अमित शहा, नितीन गडकरी आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रीय लोकदल प्रमुख जयंत चौधरी, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल, जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी या नेत्यांनी या प्रस्तावला अनुमोदन दिलं तर NDAच्या सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना नायडू म्हणाले की, मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारनं गेल्या दहा वर्षांत महत्त्वपूर्ण पावलं उचलली असून देशानं उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तन पाहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्या बद्दल सर्वांचे आभार मानताना आपल्या आघाडीच्या आगामी दहा वर्षांच्या रूपरेषेबाबत भाष्य केलं. तसंच तंत्रज्ञनाला कायम नाकरणाऱ्या विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यासाठी देशाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा खोटा प्रचार केल्याचं मोदी म्हणाले. आता पुढील पाच वर्षे मतदान यंत्रांवर टीका होणार नाही, आपल्या आघाडीचं नाव बदलून निवडणुकांना सामोरं गेलेल्या विरोधकांना जनतेनं संधी नाकारली असल्याचं मोदी म्हणाले. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवासस्थानी जावून भेट घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like