Richest MP | निलेश लंके सर्वात गरीब, तर ‘हा’ खासदार सर्वात श्रीमंत; संपत्तीचा आकडा ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Richest MP | महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीची धुळधाण उडवली आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या असून महायुतीला फक्त 17 जागा जिंकता आल्या आहेत. राज्यातील 48 खासदारांची नावे समोर आली आहेत. पण यामध्ये सर्वात श्रीमंत खासदार कोण? याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार (Richest MP) आहे. उदयनराजे, त्यांच्या पत्नी, मुले व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 296 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे.उदयनराजेंची एकूण स्थावर आणि जंगम संपत्ती 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634 रुपये आहे. तर, त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम मालमत्ता 6 कोटी 89 लाख 47 हजार 201 रुपये एवढी आहे. उदयनराजेंकडे 1 कोटी 90 लाख 5 हजार 165 रुपये किमतीच्या अलिशान गाड्या आहेत. उदयनराजेंकडे 172 कोटी 94 लाख 49 हजार 691 रुपये किमतीची शेतजमीन आहे. तर, पत्नीकडे 3 कोटी 79 लाख 37 हजार 570 आणि मुलाच्या नावे 3 लाख 14 हजार 820 रुपये किमतीची जमिन आहे. भोसले कुटुंबीयांकडे 28 कोटी 79 लाख 48 हजार 565 रुपये किंमतीची शेतजमीन असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. उदयनराजेंकडे 30, 863 ग्रॅम सोनं चांदी, त्यांच्या पत्नीकडे 4750 ग्रॅम दागिने, कुटुंबाकडील सोने 628 ग्रॅम, तर मुलीचे सोनं 7054 ग्रॅम आहे. दरम्यान, उदयनराजेंवर 2 कोटी 44 लाख 63 हजार 842 रुपयांचे कर्ज आहे.

अहमदनगरचे निलेश लंके राज्यातील सर्वात गरीब खासदार आहेत. निवडणूक आयोगानुसार,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदार निलेश लंके यांच्यांकडे 7.8 लाख रुपयांची संपत्ती आहे. निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like