मतमोजणीदिवशी शिरुर लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र परिसरात नो- पार्किंग झोन घोषित

Vote Counting: शिरुर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ४ जून रोजी पहाटे ००.०१ ते सायं. ०६.०० या कालावधीत चार ठिकाणी नो- पार्किंग झोन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी घोषित केला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोडाऊन क्र. २, ब्लॉक पी-३९, एमआयडीसी एरिया रांजणगाव, कारेगाव, ता. शिरुर येथे शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी पार पाडली जाणार आहे. मतमोजणी ठिकाणाच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सदर कालावधीत अहमदनगर- पुणे महामार्गावर राजमुद्रा चौक ते कर्डेलवाडी चौक, यश इन चौक ते एसबीआय चौक कारेगाव एमआयडीसी, यश इन चौक ते रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता आणि युकेबी कंपनी चौक ते मॅकफेरी कंपनी समोरील चौक संपूर्ण रस्ता कारेगाव एमआयडीसी या ठिकाणी नो- पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.

पुणे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलमांप्रमाणे प्राप्त अधिकारांन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ नुसार हे आदेश जारी करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ तसेच भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी

You May Also Like