Petrol Diesel Price | मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलचा दर कमी होणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Petrol Diesel Price | राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पेट्रोलवरील कर 26 टक्के वरून 25 टक्के करण्यात येणार आहे या बदलामुळे या तिन्ही महापालिकेतील पेट्रोलचा दर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे कमी (Petrol Diesel Price) होणार आहे.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत, अशी घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली आहे. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा रकरण्यात आली आहे.

स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणाही यावेळी अजित पवारांनी केलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like