Prakash Ambedkar | काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा?

Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजप-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले आहेत, हे उघड आहे.

आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती आणि जीवघेणे वातावरण निर्माण करण्याचा भाजप आरएसएसचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस गप्प का? यापैकी दोन हल्ले तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले. पण राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनांचा निषेध केला नाही किंवा त्यांना या हिंसाचारात बळी पडलेल्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. आपल्या मुस्लिम बांधवांवरील हिंसाचाराकडे लक्ष देण्यास काँग्रेस का टाळाटाळ करत आहे?

…तर एवढी भीती का?
मला सांगा, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, मी तुम्हाला सर्वांना आधीच सावध केले होते आणि आता मी पुन्हा चेतावणी देत आहे. हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यांना तुमची पर्वा नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत.

हा कोणत्या प्रकारचा मजबूत विरोधी पक्ष आहे?
यांच्यासाठी मुस्लिम हा फक्त निवडणुकीत जुमल्याप्रमाणे मते मिळवण्यासाठी वापरण्याचा शब्द आहे. मुस्लिम समाज जगला काय मेला काय, यांना काहीही फरक पडत नाही. हे फक्त आपली जुनी संपत्ती, खुर्ची आणि घरे वाचविण्याची लढाई लढत आहेत, देश वाचविण्याची नव्हे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like