Prakash Ambedkar | वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम-गयाराम, त्यांना माणसं ओळखता येत नाहीत

Prakash Ambedkar | विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत शिवसेना उबाठा गटाशी हातमिळवणी केली. वसंत मोरे यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ९ जुलैला त्यांचा रितसर शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून वसंत मोरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

यानंतर वसंत मोरे यांनी वंचितवर टीका करताना म्हटले, वंचित आघाडीच्या लोकांनी मला स्वीकारले नाही. अनेक लोकांनी निवडणुकीत माझे काम देखील केले नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी काम केले असते तर लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असते. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत, असा हल्ला वसंत मोरे यांनी शुक्रवारी केला. आता यावरुन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वसंत मोरे यांच्या बाबत आयाराम गयारमचे राजकारण बघायला मिळत आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाही. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडतात, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like