Narendra Modi | पंतप्रधानांनी स्वत: ट्रॉफी न घेता रोहित आणि द्रविडच्या हाती सोपवली, नरेंद्र मोदींच्या कृतीचं होतंय कौतुक

Narendra Modi | भारतीय संघाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती आणि आज म्हणजेच 4 जुलै रोजी टीम इंडिया आपल्या देशात परतली.

भारतीय संघ मायदेशी परतताच दिल्ली विमानतळावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ITC मौर्या हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडिया थेट पीएम मोदींना  (Narendra Modi) भेटायला गेली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान मोदींना भेटायला पोहोचली
वास्तविक, न्यूज एजन्सी एएनआयने आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया पीएम मोदींना भेटण्यासाठी आली आहे. भारतीय संघाचे सर्व खेळाडू खास जर्सी घालून दिसले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ‘इंडिया चॅम्पियन्स’ नावाची खास जर्सी परिधान केली आणि टीमने 7, कल्याण लोक मार्ग येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. व्हायरल व्हिडीओमध्ये पीएम मोदी सर्व खेळाडूंना त्यांचे अनुभव विचारताना आणि सगळ्यांशी मस्करी करताना दिसत आहेत.

त्याचवेळी, व्हिडिओमध्ये असे दिसले की कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड पीएम मोदींच्या शेजारी बसलेले दिसत आहेत आणि रोहित आणि द्रविडने टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी पीएम मोदींना दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like