Pune Shivsena | बाबासाहेबांचा अवमान केल्याबद्दल आव्हाडांच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेचे तीव्र आंदोलन

Pune Shivsena | बुधवारी महाड येथे मनुस्मृतीच्या प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आंदोलनावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पुणेचे (Pune Shivsena) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख अमर घुले, शहर प्रवक्ते अभिजित बोराटे, उपशहर प्रमुख संतोष राजपूत, उपसंघटक अक्षय तारू, निशिगंधा थोरात, निकिता भंडारी, राजश्री माने, शीत गाडे, प्रिया अगरवाल, संतोष जाधव, सचिन भानगिरे, अशा यादव, चंचल किराड व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी बुधवारी (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला. याच कृत्याच्या निषेधार्थ पुण्यातील हडपसर येथे शिवसेना पुणे शहराच्या वतीने जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून तीव्र आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाडांनी या पूर्वीही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी भान हरवून अशा अनेक चुका केल्या आहेत पण यावेळी बाबासाहेबांच्या अपमानाची चूक ही जनता विसरणार नाही असे आव्हान शिवसैनिक आंदोलकांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like