Pune Traffic News | चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील चतु:श्रृंगी वाहतूक (Pune Traffic News) विभागांतर्गत संत ज्ञानेश्वर चौकाजवळील एफ सी महाविद्यालय ते मंजाळकर चौक ८०० मीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्थेत बदल करून पी १, पी २ करण्यात आल्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या (Pune Traffic News) अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १३ जूनपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like